- मानसिक दबावाखाली घेतला टाेकाचा निर्णय
अनिल कांबळे
नागपूर,
Husband's suicide पतीशी भांडण करुन घरातून निघून गेलेल्या पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने घरात गळास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पाचपावली परीसरात उघडकीस आली. माेहित जितेंद्र देसाई (35, महेंद्रनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पाचपावली पाेलिसांनी माेहित देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी आता पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने वारंवार भांडण करणे, माेबाईल नंबर ब्लाॅक करून संपर्क ताेडणे आणि मानसिक छळ केल्यामुळेच माेहित यांनी गळास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचा आराेप कुटुंबियांनी केला आहे.
Husband's suicide पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माेहित देसाई यांचा विवाह पूजा (30) हिच्याशी नाेंदणी विवाह पद्धतीने झाला हाेता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाले. 21 जुलै 2025 राेजी पूजा हिने ‘मी घरातून निघून गेली यालाच तू माझी साेडचिठ्ठी समज’ अशी धमकी दिली हाेती. ती माहेरी निघून गेली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या माेहितीने पूजाची मनधरणी केली. त्यानंतर ती काही काळ लष्करीबाग येथे माेहितसाेबत राहण्यास आली, पण पुन्हा भांडण करून माहेरी निघून गेली. माेहित यांनी पत्नीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने काेणताही प्रतिसाद दिला नाही. उलट तिने पतीचा माेबाईल नंबर ब्लाॅक करून संपर्क पूर्णपणे ताेडून टाकला. पत्नी वारंवार घर साेडून जात असल्याने आणि संवाद नाकारत असल्याने माेहित प्रचंड मानसिक दबावाखाली हाेते. याच विवंचनेतून त्यांनी 12 ेब्रुवारी राेजी आपल्या राहत्या घरी गळास घेऊन आत्महत्या केली हाेती. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. मात्र, माेहित यांची आई नीलिमा देसाई (56) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि सखाेल चाैकशीअंती पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद केली आहे. सुनेने मुलाचा मानसिक छळ केला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आराेप केला आहे. या तक्रारीवरून पाचपावली पाेलिसांनी आराेपी पत्नी पूजा देसाई हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस उपनिरीक्षक विनायक बुवा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.