पत्नीशी प्रेमसंबंधाच्या संशयातून मित्रावरच चाकू हल्ला

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Knife attack on friend पत्नीसाेबत मित्राचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याच्या संशयातून शहरातील कलमना मार्केट परिसरात एका सराईत गुन्हेगाराने मित्रावरच जीवघेणा हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. मयूर बाेरकर असे जखमीचे नाव असून त्याच्यावर तिकेश आणि अभिषेक या दाेन सराईत गुन्हेगारांनी हल्ला केला. चाेरीच्या गुन्ह्यांप्रकरणी या दाेघांनी यापूर्वी तुरुंगवासही भाेगला आहे. पत्नीचा जुना मित्र मयूर बाेरकरशी प्रेमसंबंध जुळल्याचा संशय तिकेश घेत हाेता.
 

chaku  
 
 
Knife attack on friend यावरून दाेघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू हाेता. 26 एप्रिलच्या मयूरने तिकेशला चर्चेसाठी कलमना मार्केटसमाेरील निर्जनस्थळी बाेलावले. तिकेश आपला साथीदार अभिषेकसह तिथे पाेहाेचला, तर मयूर शेख अयान नावाच्या मित्राला साेबत घेऊन तिथे आला. या भेटीदरम्यान, दाेघांमधील आधी वाद झाला. ताे विकाेपाला गेला. त्यानंतर तिकेश व अभिषेक या दाेघांनी मयूरवर चाकूने हल्ला केला. मयूरने स्वतःचा बचाव करत हा हल्ला परतावून लावला. ताे जखमी झाला तरी थाेडक्यात वाचला. दरम्यान दाेन्ही आराेपींनी त्याचा मित्र शेख अयान याला पकडले आणि त्याच्या छाती व पाेटावर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर हल्लेखाेर घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यानंतर अयानची प्रकृती अत्यंत गंभीर बनली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी अयानला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कळमना पाेलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. आराेपी फरार झाल्याने पाेलिस शाेध घेत आहेत.