कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी बळकट करावी : आ. डॉ. मनीषा कायंदे

(शिंदे गटाची आरमोरी विधानसभा क्षेत्र आढावा बैठक संपन्न)

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
आरमोरी, 
manisha-kayande : शिवसेना बूथ पातळीवर (गावागावात) मतदार यादी शुद्धीकरण आणि संघटनात्मक मजबुतीकरणासाठी बिएलएच्या माध्यमातून सक्रिय झाली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने पारदर्शक मतदार नोंदणीसाठी सक्रिय व्हायचे आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोककल्याणाची भूमिका आणि विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट व्हावे. शिवसेनेचा हा झंझावात असाच कायम ठेवून, जनसेवेचा वारसा अधिक जोमाने पुढे नेवून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ता हस्तगत करावी, असे आवाहन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विधानपरिषद सदस्या तथा शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी केले.
 

jk 
 
ते आरमोरी येथील एस. के. सभागृहात आरमोरी विधानसभा आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्स्थिती व मार्गदर्शक म्हणून लोकसभा संपर्क प्रमुख माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार सहसराम कोरेटी, जिल्हा संपर्क प्रमुख संदिप बरडे, युवासेनेचे प्रदेश सदस्य हर्षद शिंदे, लोकसभा संघटक सुरेंद्रसिह चंदेल, जिल्हा महीला संपर्क प्रमुख वर्षा मोरे, जिल्हाध्यक्ष संदीप ठाकुर, आरमोरी नगरपरिषद सदस्य सूरज भोयर, उमा चंदेल, भुषण अलामे, दिपक बारसागडे, वाकुडकर, दिपक नरडांगे, नितीश नागापुरे, पुंडलीक येवले, आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते, समन्वयक राकेश बैस उपस्थित होते.
 
 
पुढे बोलतांना आमदारकायंदे म्हणाल्या की, विदर्भ ही कुणाचीही जागीर नाही, विदर्भामध्ये शिवसेना आहे. कोणाचीही मक्तेदारी चालणार नाही. आता पक्षात फेरबदल व बांधणी केलेली आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना समृद्धी मार्ग मंजूर केला. एकीकडे गडचिरोली हा नक्षलवाद म्हणून ओळखला जायचं, तो आता भारतातील सर्वात मोठी स्टील हब म्हणून ओळखली जात आहे. याचे सर्व श्रेय ना. शिंदे यांना जाते. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे संरक्षण सुद्धा काढून टाकले. मात्र ते न डगमगता गडचिरोलीमध्ये एकटे राहिले. गडचिरोलीमध्ये बदललेले रूप दिसत आहे, ते यांचेच श्रेय आहेत. या जिल्ह्यात होत असलेल्या प्रगतीचा मार्ग शिंदे साहेबांनी उघड केला, त्या मार्गावर आता सर्व कार्यकर्त्यांना यायचं आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे बडेजाव करीत नाहीत तर ते कृती करून दाखवतात.
 
 
आज ते उपमुख्यमंत्री असले तरी, शिंदे शिवसेनेसाठी ते मुख्यमंत्रीच आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार सहसराम कोरेटी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष संदीप ठाकुर यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचून समस्या दुर करण्यासाठी ना. शिंदे यांनी सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील 103 महीला व युवकांनी आढावा बैठकीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. संचालन भुषण अलामे यांनी तर आभार विधानसभा समन्वयक राकेश बैस यांनी मानले. यावेळीआरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुका प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.