८.६१ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त; एकास अटक

*गुन्हे शोध पथकाची कारवाई

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
mephedrone-seized : गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८.६१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. २८ रोजी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम गौतम (३२) रा. साईपार्क, सावंगी मेघे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
 
 
jk
 
 
 
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम गौतम याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ मॅफेड्रॉन (एम. डी.) अमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी दुचाकी व एमडी असा १ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष ताले, पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्मेद्र, नितीन ईटकरे, महेद्र पाटील, रंजीत भुरसे, अमोल साळवन यांनी केली.