अस्वस्थ समाजजीवनाला साहित्यिकांनी दिशा द्यावी : पद्मश्री लक्ष्मण माने

*मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
laxman-mane : सध्याच्या काळात सर्वच स्तरांवर मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अस्वस्थता दूर करण्यासाठी आता साहित्यिकांनी पुढाकार घेऊन समाजाला नवी दिशा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.
 

k 
 
 
 
स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात शनिवार २५ रोजी मारोतराव नारायणे प्रतिष्ठानचा वाड्मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ‘आजचे समाजजीवन आणि साहित्य व्यवहार’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे पुष्प गुंतफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
या समारंभात अकोला येथील साहित्यिक दिवाकर कृष्ण आचार्य, इस्लामपूर येथील सूरज चौगुले, वसई येथील सखाराम डाखोरे, कोल्हापूर येथील आलोक जत्राटकर व मुंबई स्थित डॉ. स्मीता दातार यांना मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
माने पुढे म्हणाले, विकासाच्या नावाखाली अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत. हे अब्जावधी रुपये गरिबांच्या करातून काढले जात आहेत. विकासाच्या नावावर भ्रामक कल्पना पसरवल्या जात आहेत. याला तोंड द्यायचे असेल तर रस्त्यावर उतरून चळवळी उभ्या केल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
 
याप्रसंगी पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील, डॉ. प्रमोद शंभरकर यांची उपस्थिती होती. यशस्वतीतेकरिता मारोतराव नारायणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, कोषाध्यक्ष अजय भस्मे, कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, राहुल भस्मे, धीरज नारायणे, जिगिषा नारायणे आदींनी सहकार्य केले.