रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या

बळीराजा सापडला आर्थिक संकटात

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
सेलू,
prices-of-chemical-fertilizers : सततची नापिकी त्यातही शेतमालाला पाहिजे तसा भाव ही नाही अश्यातच शासनाने रासायनिक खताच्या किमतीत प्रती बॅग ३०० ते ५०० रुपयाची वाढ केल्याने बळीराजाचे खरिपाचे नियोजन ढासळले आहे.
 

prices-of-chemical-fertilizers 
 
 
सतत तीन वर्षापासून बळीराजा तोट्याची शेती करीत आहे. नापिकी व अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली म्हणून शासन एकीकडे मदतीचा हात देत असताना दुसरीकडे खताच्या किमतीत वाढ करून दिलेली मदत तर काढून घेत नाही ना अशी भावना शेतकरी व्यत करीत आहे.
 
 
पिकाच्या वाढीसाठी व अधिक उत्पन्न घेण्यासाठी ज्या रासायनिक खताची पिकांना गरज असते त्यात १९.१९.१९, २४.२४.०, पोटॅश, २०.२० ०.१३,१०.१०.२६ या रासायनिक खताची गरज असते अन् याच खताच्या किमतीत भरीव वाढ झाली आहे.
शेतकर्‍यावर पीक कर्ज थकीत असल्याने व कर्जाची रक्कम भरू शकत नसल्याचे पाहून महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली.
 
 
खताच्या वाढत्या किमतीचा फटका ग्रामीण भागातील कृषी केंद्र चालकांना बसणार आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी बी बियाणे व रासायनिक खत उधारीवर घेतात. पीक निघाल्यानंतर बिल चुकता करतात अश्यावेळी कृषी केंद्र चालकांना आर्थिक बळ उभे करावे लागणार आहे असे कृषी केंद्र चालक खाजगीत बोलत आहेत.
 
 
कपाशीचे व केळीचे पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा खर्च आहे. तीन वर्षापासून तोट्याची शेती सुरू आहे. कसाबसा खर्च भागवून दिवस काढणे सुरू आहे. पण, शेतीचा वाढता खर्च पाहता भाव मिळत नाही. बिना खताची कमी खर्चाची शेती करावी लागेल की पोटापुरतेच पिकवावे हा तर दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल. आता तर समोर शेती करणे कठीण होणार आहे असे शेतकरी बोलत आहे.