मंत्री झालो तर दहा मंत्र्याचे काम करेल : रवी राणा

मुख्यमंत्र्यांची लवकरच कृपा होईल

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
अमरावती,
ravi-rana : आमदार म्हणून तर मी दहा आमदारांचे काम करतो. मुख्यमंत्र्यांची जर कृपा झाली तर मंत्री म्हणून मी दहा मंत्र्याची काम करेल. विधानसभा आश्वासन समितीचा अध्यक्ष म्हणून कामची चुणूक दाखविली आहे, असे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी केले.
 
 
मुख्यमंत्र्यांची लवकरच कृपा होईल
 
आमदार राणा यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून मंगळवारी महाराजस्व अभियानातंर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा नेत्या नवनीत राणा व अन्य उपस्थित होते. आ. राणा पुढे म्हणाले, जनतेला न्याय देण्याचे काम मी सातत्याने करतो. त्यामुळेच मला जनतेने चौथ्यांदा विजयी केले. मी मंत्री होण्याची नागरिकांना जी अपेक्षा आहे, तीच मला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री बावनकुळे हे महाराष्ट्र व आपल्या जिल्ह्यासाठी चांगले काम करीत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. आश्वासन समितीचा अध्यक्ष म्हणून मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. समितीला मी ओळख मिळवून दिली. मंत्र्यांनी सभागृहता दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे कामी मी करीत आहे. त्यात मला चांगले यश मिळाले. लोकांची कामे मार्गी लागावी हीच माझी नेहमी अपेक्षा असते. गरीबी मी पाहीली असल्याने आमदार झालो तरी जमिनीवर आहे. गोरगरिबांना मदत करणे हा माझे कर्तव्य आहे. माझे हे कार्य निरंतर सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भाषणा दरम्यान उपस्थितांनी टाळ्यांचा वारंवार कडकडाट केला.