बुलढाणा,
sanjay-gaikwad : आ. संजय गायकवाड यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाच्या कथित प्रकाशक प्रशांत आंबी याला सडेतोड शब्दांत जाब विचारला. या पुस्तकामध्ये छत्रपतींचा अवमान झाल्याचा आरोप करून अशा साहित्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी व्यक्त केली.
आ. संजय गायकवाड तसेच पुस्तकाचे प्रशांत आंबी यांच्यात शिवराळ भाषेत झालेला शाब्दीक वाद वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. कॉम्रेड, कम्युनिस्ट, मार्सवादी विचारसरणीचे गट, काँग्रेस तसेच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून विविध स्वरूपातील आंदोलने करण्यात आली. आ. गायकवाड यांचे फोटो जाळण्यात आले. तर दुसरीकडे आ. गायकवाड समर्थकांनी बुलढाणा मतदार संघात फोटोला दुग्धाभिषेक करून सन्मान अभियान राबविण्यात आले. यानंतर संबंधित प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आ. संजय गायकवाड यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची घोषणा करत त्यांच्या घरी जाऊन पुस्तकाचे वाचन करण्याचा इरादा व्यक्त केला. या घोषणेनंतर बुलढाणा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आ. संजय गायकवाड यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी समर्थक शहरात एकत्र आले होते. काही माध्यमांमधून आंदोलन आमदारांच्या घरापर्यंत पोहोचल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही आंदोलन ठराविक अंतरावरच पार पडले आंदोलकांना स्थानबद्ध करून सोडण्यात आले.