शरयू चिव्हाणेचे राज्य निबंध स्पर्धेत सुयश

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
यवतमाळ अर्बन बँकेचा पुढाकार

घाटंजी, 
Sharyu Chivane's success आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने लक्ष्मणराव इनामदार स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहकार विषयावर आधारित ही निबंध स्पर्धा चार गटांत घेण्यात आली होती. त्यातील शालेय गटातून शरयू चिव्हाणे हिचा राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे. या गटात महाराष्ट्रातून 1950 निबंध आले होते.
 
 
sharyu
 
शरयू ही येथील श्री समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी असून श्री समर्थ विद्यालय नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना विविध स्तरांवरील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करत असते. त्यातलाच एक भाग म्हणून यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने झालेल्या राज्यस्तर निबंध स्पर्धेतची माहिती बँकेचे कर्मचारी प्रवीण बोंद्रे दिली असता विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी शरयू चिव्हाणे हिने नेत्रदीपक कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत स्वतःबरोबरच शाळेचेही नाव मोठे केले.
 
 
Sharyu Chivane's success  रविवार, 26 एप्रिल रोजी यवतमाळ येथे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे, बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे यांच्या उपस्थितीत भव्य सहकार परिषदेत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यामध्ये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन शरयूला गौरविण्यात आले. तिच्या यशाचे कौतुक व अभिनंदन संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन चोपडे, सचिव नरेश वैद्य, मुख्याध्यापक अमोल वैद्य, उपमुख्याध्यापक अरविंद मडावी, पर्यवेक्षक राजेश मदने व तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचाèयांनी केले.