हिंगणी,
study camp of agriculture department स्थानिक संत केजाजी महाराज भक्त निवास घोराड येथे एक दिवसीय कृषी निविष्ठा विक्रेत्यांंचे अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला कृषी व्यवसायी प्रमोद शिंदे अध्यक्षस्थानी होतेे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर होते. या अभ्यास शिबिरात सेलू तालुका कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष महेश मेश्रे यांनी व्यवसाय करत असताना किरकोळ विक्रेत्यांना भेडसावणार्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडली. या शिबिराला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपरीकर यांनी खरीप हंगामात येणार्या समस्या व त्यांचे निराकरण कसे करायचे याविषयावर मार्गदर्शन केले.study camp of agriculture department जिल्हा कृषी विकास अधिकारी शिवा जाधव, जिल्हा मोहीम अधिकारी ढोणे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रफुल महाकाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ओम पिहुल यांनी केले. यशस्वीतेसाठी संघाचे सचिव आशिष लोहिया, तुषार भगत, जोत्सना घरत यांनी परिश्रम घेतले.