वाशीम,
dc yogesh kumbhejkar जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देत स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देणे आणि निर्यातवाढीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधणे, हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. उद्योग, रोजगार, एक जिल्हा एक उत्पादन व निर्यात प्रोत्साहनासंदर्भात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समिती सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घूले, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव, एमआयडीसी कार्यकारी अभियंता केदार पवार, एडीटीपी राजय साबळे, एमएसईडीसीएलचे कार्यकारी अभियंता विनोद मालवी, ईवाय सल्लागार अंकित गुप्ता, सनदी लेखापाल पंकज अग्रवाल, आयटीआय प्रतिनिधी निलेश झोडपे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक यशवीर कुमार तसेच एमआयडीसी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. एमआयडीसीत पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भरसभेच्या प्रारंभी एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगवाढ आणि मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा झाली.

औद्योगिक परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा व वीज यांसारख्या सोयी अधिक सक्षम करण्यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागांना दिले.स्थानिकांना ८० टक्के रोजगाराचा आग्रहउद्योगांनी किमान ८० टक्के रोजगार स्थानिक युवकांना देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले. यासाठी उद्योगांशी समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.ऍप्रेंटीशीपमधून कौशल्यविकास अॅप्रेंटीशीप योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेचा आढावा घेण्यात आला. अधिकाधिक युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यावर भर देण्यात आला.निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला चालनाएक जिल्हा एक उत्पादन (वन डिस्ट्रिट वन प्रॉडट) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजनांवर चर्चा झाली.
स्थानिक उद्योग, उद्योजक व शेतकरी उत्पादक गटांना निर्यात प्रक्रियेचे मार्गदर्शन, गुणवत्ता मानके, ब्रँडिंग व पॅकेजिंग सुधारणा यावर विशेष भर देण्यात आला.dc yogesh kumbhejkar निर्यातक्षम उत्पादनांची निवड, प्रशिक्षण कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.सीए पंकज अग्रवाल यांनी ‘मिलाप’ पोर्टलवरील अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सभेचे सादरीकरण पूनम घूले यांनी केले. जिल्ह्यात औद्योगिक विकासासोबत स्थानिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले.