डोंबिवली,
The protector became the predator डोंबिवलीमध्ये एका तरुणीबाबत अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ असलेल्या या तरुणीवर आधी तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी खोट्या आरोपांच्या आधारे अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तिच्या मैत्रिणीच्या वडिलांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली.
घटनेनंतर ती तरुणी पूर्णपणे एकटी पडली होती आणि तिला कोणाचीही साथ मिळाली नाही. न्याय मिळावा म्हणून ती पोलिसांकडे जाण्याच्या तयारीत असतानाच तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणाकडे मदत मागितली. The protector became the predator त्या तरुणाने तिला पोलिस ठाण्यात नेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, मदतीच्या नावाखाली तिला फसवून तो तरुण तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे. The protector became the predator एवढेच नव्हे तर तिच्याकडील पैसेही त्याने जबरदस्तीने काढून घेतले आणि तिचा मोबाईल फोनमधील सिम कार्ड काढून तिला एकटी सोडून तो निघून गेला.
या प्रकारानंतर धैर्य एकवटून पीडित तरुणीने शिवसेनेच्या एका कार्यालयात जाऊन मदतीची मागणी केली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली आणि तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. The protector became the predator पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्या दिशेने तपास सुरू आहे. The protector became the predator या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महिला अधिकारी करत असून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे.