शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा : खा. डॉ. नामदेव किरसान

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
गडचिरोली, 
dr namdev kirsan जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्या.
 

dr namdev kirsan 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.
 
बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे आणि प्रलंबित कामांबाबत त्यांनी माहिती घेतली. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्यांनी भर दिला. पोषण आहार वाटप करताना अनेकदा धान्य अगोदर खरेदी केल्या जाते आणि बर्‍याच उशिरा त्याचे वाटप केला जाते. त्यामुळे त्या धान्याची गुणवत्ता खराब असल्याचे नमूद करत यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले.
 
स्वच्छ भारत मिशन (शहरी) योजनेअंतर्गत नगरपरिषदेद्वारे घंटागाडीने घरोघरी कचरा उचलण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरीदेखील काही ठिकाणी कचरा जमा होत असल्याबाबत त्यांनी नगरपरिषदेला घंटागाडीद्वारे घरूनच कचरा जमा व्हावा याची खबरदारी घेण्याची सांगितले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलासाठीच्या थकित हप्त्याची रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात काही ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती सवर्गातील नागरिकांच्या घराच्या हप्ते प्राप्त झाले आहे.dr namdev kirsan मात्र इतर मागासवर्ग संवर्गातील घरकुलाची हप्ते शासनाकडून वितरित झाल्यावरही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित असल्याचे लक्षात आणून देत रकमा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. दीनदयाल अंत्योदय योजना आणि दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना स्वावलंबी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.