मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षात धमकीचा फोन!

सुरक्षा यंत्रणा अलर्ट

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
मुंबई,
threatening-call : मुंबईतील रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षात एक धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहरातील सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली असून विविध ठिकाणी तपास सुरू करण्यात आला आहे.

call
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीकडून रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून धमकी देण्यात आली. या कॉलनंतर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि संबंधित भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली.
रेल्वे स्थानकांवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. बॉम्ब शोधक पथक आणि सुरक्षा दलांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.