शेतातील तुषार सिंचन संच अज्ञाताने जाळले

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
मानोरा, 
tushar-irrigation-system-burnt : तालुक्यातील कारखेडा येथील शेतकरी विवेक सुभाष परांडे यांच्या शेतातील तुषार सिंचन संच अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना घडली आहे. यामुळे परांडे यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
 
k
 
 
 
 
शेतात मोठ्या प्रमाणात राखेचा ढीग पडला आहे. जळून खाक झालेल्या तुषार सिंचन संचाचे अवशेष आणि पाईपचे जळालेले तुकडे स्पष्टपणे दिसत आहेत. सभोवतालची जमीनही जळल्यामुळे काळी पडली आहे. विवेक परांडे यांनी शेतीसाठी मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून तुषार सिंचन संच बसवला होता. पाणीटंचाईच्या काळात पिकांना पाणी देण्यासाठी हा संच अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास हा संच पेटवून दिल्याने तो पूर्णपणे जळून नष्ट झाला आहे.
 
 
तुषार सिंचन संचामुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणे शय होत होते. आता हा ३० पाईप १२ नोझलांचा संच जळाल्याने येणार्‍या हंगामातील पिकांचेही नुकसान होण्याची शयता निर्माण झाली आहे. मेहनतीने उभा केलेला संच एका क्षणात जाळला. आता नवीन संच बसवण्यासाठी पुन्हा पैशांची जुळवाजुळव करावी लागेल, असे विवेक परांडे यांनी सांगितले.
 
 
या घटनेमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून, अज्ञात आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शेतातील कृषी साहित्याची सुरक्षितता धोयात आल्याने रात्री गस्त वाढवावी, अशीही मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.