दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन

वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
मुंबई
actor Bharat Kapoor दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांचे निधन झाले. सायंकाळी साडेसहा वाजता कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
  
bharat kapoor
actor Bharat Kapoor भावूक झालेल्या अवतार गिल यांनी सांगितले की, दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून अभिनेत्याची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी अभिनेत्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच इंटरनेटवर दुःखाची लाट पसरली. चाहत्यांच्या मते, भरत यांचे निधन हे मनोरंजन विश्वासाठी एक मोठे नुकसान आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध चेहरा
actor Bharat Kapoorभरत कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी १९७०, ८० आणि ९० च्या दशकात उत्कृष्ट काम केले. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. छोट्या भूमिका असोत, सहाय्यक भूमिका असोत किंवा खलनायकी भूमिका असोत, त्यांनी प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी १९७२ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासून भरत कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी प्रत्येक भूमिका आपलीशी केली. ते बèयाच काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर होते.
actor Bharat Kapoor मालिकांमधून त्यांनी टेलिव्हिजनवरही आपली नवी ओळख निर्माण केली होती. २०११ पासून ते पडद्यावर दिसले नाहीत. भरत यांनी नूरी, राम बलराम, लव्ह स्टोरी, बाजार, गुलाम, आखरी रास्ता, सत्यमेव जयते, स्वर्ग, खुदा गवाह, रंग, बरसात आणि साजन चले ससुराल या चित्रपटांमध्ये काम केले. कॅम्पस, परंपरा, राहत, सांस, अमानत, भाग्यविधाता, आणि कहानी चंद्रकांता की यांसारख्या टीव्ही मालिकांमधून त्याने टेलिव्हिजनवरही आपली नवी ओळख निर्माण केली होती.