हजारो बांधव व संत महात्म्यांची उपस्थिती
शोभायात्रेत ढोलपथक, भजनी मंडळ, दुर्गावाहिनीने वेधले लक्ष
आर्णी,
'Virat Hindu Sammelan' आर्णी येथे रविवार, 26 एप्रिलला विराट हिंदू संमेलन पार पडले. यात विदर्भ, मराठवाडा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील संत महात्म्यांनी उपस्थिती दर्शवीत आशीर्वाद दिले. या संमेलनात हजारो महिला पुरुषांची उपस्थिती होती. हिंदू सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र राज्य व संत प्रकोष्ठ विदर्भ प्रांत महामंत्री गजानन सागरबाई रामचंद्र केने महाराज यांचेद्वारे आयोजित विराट हिंदू संमेलनाचे आयोजन श्रीमद भारती विद्यालयाच्या प्रांगणात झाले. अध्यक्षस्थानी रतनगढचे महंत योगी गोपालनाथ महाराज होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमंत श्यामसुंदर महाराज, श्री महंत योगीराज बापू, श्री ब्र. वेदांताचार्य, दिगंबर शिवाचार्य महाराज, श्री शिवचैतन्य शिवाचार्य, विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, सद्योजात शिवाचार्य, महंत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य पार्थ महाराज शास्त्री, वारकरी विद्यापीठ कुलगुरू श्रीसंत शंकरपुरी महाराज, व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज, श्री व्यंकटेशानंद भारती, हरिद्वारचे स्वामी महाराज, डॉ. ज्ञानेश्वर भारती महाराज, महंत भोलेनाथ महाराज, गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज, परमेश्वर कृष्णचैतन्य होते.
तसेच गुरू जनार्दन पुरी, राजेंद्र महाराज सोनोने, राजेंद्र महाराज सोनोने, अमोल महाराज, गजानन बाबा, बालयोगी आदिनाथबाबा, विश्वभंर महाराज. महंत कृष्णाराजबापू, महल हिषरात कापू महाराज यांच्याकह अन्य मठ, गुरुकुलांचे महंत महाराज, प्रमुख वक्ते प्रा. अटल पांडे, आयोजक गजानन केने महाराज, स्वागतोत्सुक राजेश आडे, आमदार राजू तोडसाम, प्रिया तोडसाम, श्यामसिंह ठाकूर, धरमसिंह ठाकूर आणि सर्व हिंदू संघटनांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत स्वागताध्यक्ष राजेश आडे यांनी केले, तर आयोजकांना गदा भेट दिली. संमेलनापूर्वी देप्प्रवाडा येथील हनुमान मंदिरात अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर शिवप्रताप चौक येथून भव्य शोभायात्रा निघाली.
'Virat Hindu Sammelan' शोभायात्रेत घाटंजीचे ढोलपथक, डोळंबावाडीचे वारकरी मंडळ, खेडबिडचे भजनी मंडळ, याम्च्यासह परिसरातिल भजनी मंडळ व दुर्गावाहिनीच्या मुलींनी यावेळी रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर करून लक्ष केंद्रित केले होते. भारती विद्यालयाच्या प्रांगणातील या धर्मसंमेलनात वर्धा येथील प्रा. अटल पांडे म्हणाले, आपल्यावर मुस्लिमांनी आक्रमण केले. सुरवातीला त्यांचा कडवा प्रतिकार फक्त भारतियांनीच केला. तो इतिहास कोणीच सांगत नाही. हिंदू धर्म हा बहुसंख्य देवी देवतांना मानतात त्यामुळे आपली संस्कृती व संस्कार टिकून आहे. जे धर्म एकालाच मानतात, पूजतात, त्यांचे वर्तन व संस्कारात फार मोठी तफावत आहे. ते कोणाचेच नाहीत.
पोहरादेवीचे महंत जितेंद्रनाथ महाराज व महंत योगीराजबापू यांनीही हिंदू धर्मावर होणारे आघात यावर घणाघाती विचार व्यक्त केले. प्रास्ताविक गजानन केने महाराजांनी, संचालन आकांक्षा तिवारी यांनी व आभारप्रदर्शन डॉ. श्याम गुटे यांनी केले.