वाशीम शहरवासीयांना पाणीबाणी चा सामना करावा लागणार

भूमीगत वीज पुरवठा झाला खंडीत

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वाशीम,
washim-water-crisis : पाणी पुरवठा योजनेचा भूमीगत वायर (केबल) निकामी झाल्याने वाशीम शहर वासीयांना २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
 
 
j
 
याबाबत सविस्तर असे की, वाशीम शहराला एकबुर्जी प्रकल्पावरुन दर आठवड्याला पाणी पुरवठा करण्यात येतो.मात्र, जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणारी भूमीगत वीज पुरवठा योजना निकामी झाल्याने शहरवासीयांनी जलसंकट निर्माण झाले आहे. सदर तांत्रिक बिघाड हा रेल्वे विभागाच्या हद्दीत झाला आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार त्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीतच वीज पुरवठा दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागणार आहेत. याच तांत्रिक नियमामुळे वीज पुरवठा दुरुस्तीचे काम थांबले आहे. त्याचा थेट फटका शहरवासीयांना बसत आहे.
 
 
नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले की, वीज पुरवठा दुरुस्तीला किमान ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांना पाणी मिळणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा खंडीत झाल्याने शहरवासीयांना पाणीबाणी चा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.