वर्धा जिल्ह्यात ‘मन की बात’ दिल तक

भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या पत्राने उत्साह

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वर्धा,
Man Ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा अभिनव नागरिकांनी डोयावर घेतला आहे. मन की बात या कार्यक्रमातून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरल्या जातो. रविवारी सादर झालेल्या मन की बात कार्यक्रमात वर्धा जिल्हा भाजपाने नियोजन केल्याने चारही विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मन की बात कार्यक्रम बघण्याचा महाराष्ट्रात विक्रम केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष आणि चारही आमदारांना स्वाक्षरीचे पत्र पाठवत अभिनंदन केले आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
 

Wardha Man Ki Baat 
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात जनतेशी थेट संवाद साधतात, सरकारी योजनांची माहिती देतात आणि यशोगाथा किंवा विशेष प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करतात. हा कार्यक्रम भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बघावा अश्या सुचना भाजपा वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. अधिकाधिक बूथ पातळीवर हा उपक्रम राबवला जावा, अशी पक्षश्रेष्ठीची अपेक्षा असते. त्यात कोण आगे अशी स्पर्धा सुरू झाली असुन वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघाने आघाडी घेतली आहे.
मन की बातच्या १३२ व्या भागात फत आर्वी मतदारसंघ राज्यात अव्वल होता आणि १३३ व्या भागात जिल्ह्यानेच मुसंडी मारली. आर्वीत शंभर टके कार्यकर्त्यांनी ‘मन की बात’ला दुसर्‍यांदा मनावर घेतले. वर्धा मतदारसंघानेही १०० टयांचा आकडा गाठला. हिंगणघाट मतदार संघ ९८. ९ टके तर देवळी मतदार संघ या आकडेवारीत माघारला ३३१ बुथ पैकी १६६ बुथवर कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. आ. सुमित वानखेडे यांच्या पाठोपाठ वर्धा, हिंगणघाट मतदार संघ अव्वल राहिले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण Man Ki Baat यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समिर कुणावार, आ. सुमित वानखेडे आणि आ. राजेश बकाने यांना पत्र पाठवत अभिनंदन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष गाते यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनाही पत्र देऊन त्यांचा उत्साह वाढवलेला आहे. वर्धा जिल्ह्यात देवळी मतदार संघ मन की बात हा कार्यक्रमात थोडा मागे गेला. परंतु, पुढच्या ‘मन की बात’मध्ये देवळीचाही चांगला सहभाग राहिल. त्याचे नियोजन आम्ही आ. बकाने, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस एकत्र बसुन नियोजन करू असे गाते म्हणाले. तर लगातार दोन मन की बातमध्ये आर्वी तालुका राज्यात अव्वल आहे. ही स्पर्धा म्हणून आम्ही काम केले नाही. परंतु, प्रत्येक कार्यकर्त्याला पंतप्रधानांचे विचार कळावे यासाठी आमचे सामूहिक प्रयत्न होते. मतदार संघातील भाजपाची एकी या निमित्ताने स्पष्ट झाली असल्याचे आ. वानखेडे म्हणाले. हिंगणघाट मतदार संघातही मन की बात कार्यक्रम कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी यशस्वी केला असे आ. कुणावार म्हणाले तर यावेळी राहिलेली कमी पुढच्या वेळी आम्ही भरून काढू असा विश्वास आ. बकाने यांनी व्यत केला. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्डह्यातील भाजपातील एकीचे बळ असल्याची प्रतिक्रिया दिली.