पुसद,
aarti-gianchandani : आरती ग्यानचंदानी यांच्या अप्रतिम चित्र कलाकृतींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. एकेक कलाकृती उत्सुकतेने बघताना रसिक मंत्रमुग्ध झाले होते. योग भवनात आरती ग्यानचंदानी यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. जवळपास शंभर रंगचित्रांनी रसिकांच्या मनात आस्वादक आनंद भरला. आरती या विज्ञानाच्या शिक्षक आहेत. त्यांना बालपणापासून चित्रकलेची आवड आहे. या आवडीतूनच त्यांनी अनेक कलाकृती साकारल्या. प्रामुख्याने वारली, निसर्ग व व्यक्तिचित्र मोठ्या प्रमाणात आहेत. या चित्रप्रदर्शनाला रसिकांची मोठी दाद मिळाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर होते. अॅड. आशिष देशमुख, डॉ. सतीश चिद्दरवार, शरद मैंद, डॉ. संजय जाधव, सूरज डुबेवार, अश्विनी जिल्हेवार, अनघा चक्करवार यांची प्रमुख उपस्थिती होती.