अमरावती,
shivarai-kulkarni : अल्पवयीन मुलींचे शोषण करणारे गाडगे नगर पोलिस ठाण्यात पकडल्या गेलेले दोन आरोपी आणि नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात अटकेत असलेले दोन आरोपी हे चिलम छावणीतील मोठे रॅकेट असल्याची खळबळजनक माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.
अमरावती शहरात रस्त्यांवर चायनीजच्या गाड्या लावणार्या मुस्लिम हॉकर्सनी हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. एका हिंदू युवतीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून रियाजुद्दीन फैयाजुद्दीन आणि वसीम या दोन मुस्लिम आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण एवढ्या पुरते सीमित नाही. ९ एप्रिलला गाडगे नगर पोलिस ठाण्यामध्ये दोन तक्रारी दाखल झाल्या. एक तक्रार १६ वर्षीय पीडित मुलीने केली. यात चिलम छावणी येथे राहणार्या २० वर्षीय समशेर शहा याने या शाळकरी मुलीला भर चौकात चाकूचा धाक दाखवून तिची छेडखानी केली.
दुसर्या घटनेत एका दहावीत शिकणार्या मुलीच्या घरापाशी चोरून लपून जाऊन त्या गरीब मुलीच्या अर्धवट बाथरूमवर चढून तिच्या अंघोळीचे व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्या शोषणाचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी शेख इरफान शेख हमीद या चिलम छावणीतील २८ वर्ष तरुणाला अटक केली आहे. शेख इरफान, समशेर शहा आणि रियाजुद्दीन पठाण हे तिघेही एकत्रच असतात. या सर्वांच्या चायनीज किंवा खाद्यपदार्थ विकण्याच्या गाड्या आहेत. या टोळीमध्ये हे तिघेच नसून आणखी काही तरुणांचा समावेश आहे. परिणामी हे प्रकरण रियाझउद्दीन पर्यंत सीमित नाही. मोठी टोळी यामागे सक्रिय असून सुरुवातीला हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना जाळ्यात ओढायचे आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे अनेक प्रकार या टोळीने केलेले आहे. या प्रकरणातील पिडितांशी संवाद साधल्यानंतर, यांनी अनेक युवतींना फसवले असल्याची माहिती मिळते आहे.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेल्या हॉकर्स संबंधात, त्यांची दादागिरी संपवण्यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेण्याची गरज आहे. परतवाड्याचे प्रकरण जेवढे गंभीर आहे, तेवढेच किंवा त्याहूनही जास्त गंभीर प्रकरण या टोळीचे आहे. अमरावती पोलिसांनी हे रॅकेट शोधून काढले पाहिजे, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. लव जिहादचा हा नवा प्रकार आहे. हिंदू युवतींनी हॉकर्सची खात्री करूनच त्यांच्या गाडीवर जाण्याचा निर्धार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.