दिसपुर,
assam-exit-poll : आसाम विधानसभा निवडणूक 2026 संदर्भात आलेल्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजप-नेतृत्वाखालील NDA आघाडीला स्पष्ट आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विविध सर्वेक्षणांनुसार, NDA ला सुमारे 80 ते 100 जागा मिळण्याची शक्यता असून, 126 जागांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला 64 चा आकडा सहज पार होईल असे चित्र आहे.
दुसरीकडे, काँग्रेस आणि तिच्या सहयोगी पक्षांना मिळून सुमारे 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळे विरोधक पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पुन्हा एकदा जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे संकेत या एक्झिट पोलमधून मिळत आहेत.
दरम्यान, असममध्ये 126 जागांसाठी मतदान पार पडले असून अंतिम निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे सध्याचे एक्झिट पोल हे केवळ अंदाज असून प्रत्यक्ष चित्र निकालानंतरच स्पष्ट होईल.