मोक्षधाम परिसरात आढळला मृतदेह

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वणी,
body-found-in-moksha-dham : शहरातील मोक्षधाम परिसरात बुधवार, 29 सकाळी मारोती नामदेव पिपराडे (वय 50, मानकी, ह.मु. वणी) यांचा मृतदेह सकाळी 9 वाजताच्या सुमारास मोक्षधामजवळील विसावा परिसरातील नालीत आढळला. यामुळे खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने पिपराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, संध्याकाळी येथील मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
 
 
k