वाशीम,
bride dies वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोस्टे अंतर्गत येत असलेल्या एका गावातील नववधूच्या आकस्मिक मृत्यूमुळे समाजमन हळहळले असून, लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत सविस्तर असे की, शिरपूर पोस्टे अंर्तगत येत असेलल्या एका गावातील तरुणीचा विवाह डोणगावातील एका तरुणासोबत निश्चित झाला होता. ३ मे २०२६ रोजी विवाह सोहळा पार पडणार होता. यानिमीत्ताने कुटुंबात आनंद, उत्साहाचे वातावरण होते. दागिने, कपडे तसेच आवश्यक खरेदीही झाली होती. आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणांना जतन करण्यासाठी तरुणीने आपल्या होणार्या जोडीदारासोबत प्री - वेडिंग फोटोशूट केले होते. नव्या संसाराची रंगीत स्वप्ने डोळ्यांत साठवून ही तरुणी आनंदाच्या भरात भविष्याची स्वप्ने विणत होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते.bride dies १६ एप्रिल रोजी तिची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार करण्यात आाले. मात्र, प्रकृती गंभीर होत गेल्याने तिला शिरपूर, वाशीम, अकोला आणि शेवटी संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नानंतर २३ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही तरुणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.