पोट निवडणूक; दिवंगत सरपंच वडिलांच्या जागी मुलाची वर्णी

*जिल्ह्यात निवडल्या गेले ३ सरपंच, ६ सदस्य

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वर्धा,
election जिल्ह्यातील २७ ग्रापंमध्ये ३ सरपंच व ३८ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये १३ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले तर काही ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या १९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. परिणामी, २८ रोजी ३ सरपंच व ६ सदस्यपदांसाठी मतदान घेण्यात आले. ६ ग्रापं क्षेत्रातील १२ मतदान केंद्रांवर ७८.५४ टके मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीचे निकाल आज बुधवार २९ रोजी जाहीर झाले. विशेष म्हणजे, समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव येथील भाजपाचे पदाधिकारी व सरपंच अंकुश खुरपडे यांचे निधन झाल्याने सरपंचपदाची जागा रित होती.
 

पोट निवडणूक; दिवंगत सरपंच  
 
 
तर उब्दा, वाघेडा येथे ग्रा.पं. सदस्यांची प्रत्येकी एक जागा रित होती. या तिन्ही ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. दिवंगत सरपंच अंकुश खुरपडे यांचा मुलगा आदित्य १७४ मतांनी सरपंच म्हणून निवडून आला. वाघेडा ग्रापंच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सुनिता महाकाळे विजयी झाल्या.election उब्दा येथे सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत मयुरी चौधरी यांना विजयी झाल्या. नांदोरा (डफरे) येथे अनुसूचित जाती महिला प्रवर्ग राखीव सरपंच पदावर नयना गायकवाड विजयी झाल्या. तर करंजी (काजी) येथे हर्षा वल्के सरपंच म्हणून विजयी झाल्या. आष्टी (श.) तालुक्यातील बोरगाव (टू.) येथे सूरज ढोले विजयी झाले. करंजी (काजी) ग्रापंत सदस्यपदासाठी प्रीती सडमाके विजयी झाल्या. नांदोरा (डफरे) येथे जीजा लोणसावळे व वृषाली डफरे विजयी झाल्या.
१३ ग्रामपंचायत सदस्य अविरोध
यापूर्वी काही ग्रापंतील १३ सदस्य जागांवर उमेदवार अविरोध निवडून आले. वर्धा तालुयातील झाडगाव ग्रापंच्या प्रभाग १ मधून कल्पना कुरटकर, २ मधून सतीश पानसे, ३ मधून जयश्री कुचेवार आणि विशाल पाटील अविरोध निवडून आले. जऊळगाव येथे प्रभाग २ मधून चेतन नगराळे, बोरगाव (नांदोरा) येथे प्रभाग २ मधून शांताराम खोत विजयी झाले. आर्वी तालुयातील पिपरी (भुतडा) ग्रापंच्या प्रभाग २ मधून भोजराज भोवरे, नांदोरा (काळे) प्रभाग ३ मधून मिना सातपुडके, आष्टी तालुयातील पिलापूर ग्रापंच्या प्रभाग ३ मधून धीरज बास्कवरे, द्रुगवाडा ग्रापंच्या प्रभाग २ मधून पल्लवी ताथोडे, हिंगणघाट तालुयातील आजनगाव (गौळ) प्रभाग २ मधून श्रीधर बोभाटे, समुद्रपूर तालुयातील वायगाव (गोंड) प्रभाग ३ मधून रोहिणी खडकर तसेच वाघेडा ग्रापंच्या प्रभाग १ मधून विद्या कोल्हे अविरोध विजयी झाले.