पशुपालकांनो सावधान..! गुरांना बसतोय उन्हाचा चटका

उष्माघाताचा वाढला धोका

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
cattle-are-suffering-from-the-heat : सद्यस्थितीत उन्हाची दाहकता वाढत चालली असून उन्हाळ्याच्या दिवसांत अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. ते विविध रोगांना बळी पडतात. त्यातच उन्हाची तीव्रता लक्षात घेता जनावरांना वेळोवेळी चारा, पाणी करून सावलीला ठेवा आणि उन्हाची दाहकता कमी झाल्यावरच बाहेर सोडा अन्यथा आपल्या जनावरास उष्मघात होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांनो, गुरांना जपा, असा सल्ला पशुवैद्यकीय अधिकाèयांनी दिला आहे.
 
 
KLK
 
 
 
उमरखेड तालुक्यात बैल, गाय, म्हैस, शेळी व कोंबड्या अशी मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे आहेत. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना हिरवा चारा मिळत नाही. परिणामी, त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. तालुक्यात उन्हाचा चटका आता वाढत आहे. त्यांना सावली व चारापाणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
जनावरांची काळजी घ्या
 
 
उन्हाळ्याच्या दिवसांत गाभण जनावरे व दूध उत्पादक जनावरांची विशेष काळजी घ्यावी. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, गुरांना उष्माघाताचे लक्षण आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाèयाचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही पशुपालकांना करण्यात आले आहे.
गोपाल ठाकूर
पशुधन विकास अधिकारी
पंचायत समिती, उमरखेड