नागपूर,
Chitpavan Brahmin Association चित्पावन ब्राह्मण संघातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या कार व बाईक रॅलीचे उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त गोरक्षण मंदिर येथून कार व बाईक रॅली (दुचाकी व चारचाकी मिरवणूक) काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे २०० ते २५० बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरला तो सुशोभित “भगवान परशुरामांचा रथ”. चित्पावन ब्राह्मण संघाच्या कार्यालयासमोर रथावरील भगवान परशुरामांच्या मूर्तीची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. Chitpavan Brahmin Associationयावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र जोग, सचिव उमाकांत रानडे, सहसचिव डॉ. संगीता घारपुरे, उपाध्यक्ष पद्माकर खरे, कोषाध्यक्ष विनय निजसुरे तसेच कार्यकारिणीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:उमाकांत रानडे,संपर्क मित्र