जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक; भावाचा जागीच मृत्यू, बहीण गंभीर जखमी

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव,
mahagav-accidnet : जनावरांची वाहतूक करणाèया भरधाव पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर युवती गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार, 29 एप्रिल रोजी सकाळी घडली. सकाळी साडेआठच्या दरम्यान बुद्धभूषण राजू भालेराव (वय 24, लक्ष्मीनगर, पुसद) हा आपल्या दुचाकीने बहीण विशाखा राजू भालेराव (वय 21) हिला परीक्षा देण्यासाठी माहूरला घेऊन जात होता.
 
 
jlk
 
हिवरासंगमच्या मुस्लिम कबरीस्थानजवळ समोरून आलेल्या जनावरांची वाहतूक करणाèया पिकअप गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. यात बुद्धभूषण जागीच ठार झाला. तर बहिण विशाखा गंभीर जखमी झाली असून तिच्या डोके, पाय व कंबरेला जबर मार लागल्याची माहिती आहे.
 
 
अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह पळून गेला. अपघातानंतर महामार्ग पोलिस व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी युवतीला उपचारार्थ दवाखान्यात हलविले. ही माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
 
 
पोलिसांनी पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याकरिता परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून पथक रवाना केली आहेत. पुढील तपास ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल राठोड, जमादार अतिश जारंडे, गजानन एडतकर, वसीम शेख व सहकारी करत आहेत.
 
रुग्णवाहिकेला उशीर; बुद्धभूषणचा जीव वाचला असता..?
 
 
या गंभीर अपघातानंतर नागरिकांनी 108 वर कॉल केले. परंतु तेे कोणीच घेत नव्हते. त्यात एकवेळ कॉल घेऊन, माहिती विचारून फोन ठेवून दिला. त्यानंतर तब्बल एक तासाने रुग्णवाहिका पोहचली. तोपर्यंत जखमी युवकाची मृत्यूशी झुंज सुरूच होती. परंतु रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानेच बुद्धभूषणचा मृत्यू झाल्याची संतप्त प्रतिक्रिया आहे.