शासकीय कामे वेळेत पूर्ण करा : इंद्रनील नाईक

पुसद तालुक्यातील विकासकामांचा आढावा

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
indranil-naik : तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सोमवारी सविस्तर आढावा घेतला. वनविभागाच्या मीटिंग हॉलमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीर विविध विभागांच्या शासकीय कामासंदर्भात शासकीय अधिकारी, कर्मचाèयांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
 
 
y29Apr-Indraneel
 
 
 
तालुक्यातील रस्त्यांची सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करून कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाèयांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असल्याचे मत नाईक यांनी व्यक्त केले. या बैठकीत खरीप हंगामाची तयारी आणि खत बियाणे यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाèयांशी चर्चा करून आढावा घेण्यात आला.
 
 
शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याची जाणीव ठेवून प्रत्येक विभागाच्या अधिकारी व कर्मचाèयांनी शासकीय सेवा देण्यासंदर्भात नाईक ह्यांनी सूचना दिल्या. या बैठकीला नप अध्यक्ष मोहिनी नाईक, वन विभागाचे अधिकारी स्वामी, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार रेखा वाणी यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.
 
 
वन कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला पुसद नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, उपवनसंरक्षक स्वामी, तहसीलदार रेखा वाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पुसद तालुक्यातील आठ जिल्हा परिषद मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
रस्ते विकास कामांत हलगर्जीपणा आणि काम चुकारपणा करणाèया शासकीय ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, असे स्पष्ट निर्देश इंद्रनील नाईक यांनी या बैठकीत दिले.
बियाणे विक्रेत्यांना इशारा
 
 
खरीप हंगामात दर्जेदार बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकèयांचे आर्थिक शोषण केल्यास परवाना रद्द होईल, असाही इशारा यावेळी राज्यमंत्र्यांनी दिला.