इतिहासाची साक्ष देणारी ‘दारव्हा वेश’ धोक्यात

तातडीने दुरुस्तीची मागणी

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
Darwha Vesh Karanja damage कारंजा शहराची ऐतिहासिक ओळख त्याच्या प्राचीन वेशींमुळे आजही जिवंत आहे. शहराच्या चारही बाजूंना उभारलेल्या दारव्हा वेश, पोहा वेश, मंगरूळ वेश आणि दिल्ली वेश या केवळ प्रवेशद्वार नसून त्या कारंज्याच्या वैभवशाली इतिहासाच्या जिवंत साक्षी आहेत. यातील मंगरूळ वेश, दिल्ली वेश आणि पोहा वेश यांचे नूतनीकरण झाले असले तरी दारव्हा वेश मात्र आज अत्यंत जीर्ण अवस्थेत उभी आहे.
 

Darwha Vesh Karanja damage 
वेशीचा काही भाग खचलेला असून, ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, ही वेश अचानक कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शयता नाकारता येत नाही. ही वेश फक्त दगड, विटा मातीची रचना नाही, तर ती कारंजा शहराच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि ओळखीची अमूल्य धरोहर आहे. त्यामुळे तिचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ती आपली सामूहिक कर्तव्यभावना आहे. स्थानिक नागरिकांनी पुरातत्व विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच कारंजा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनीही या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. यासोबतच आ. सई डहाके यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागांमार्फत दारव्हा वेसचे त्वरित दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
 
कारंजा शहराचे Darwha Vesh Karanja damage ऐतिहासिक वैभव जपायचे असेल, तर या वेशींचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे.आज वाचवले तर उद्या इतिहास जपला जाईल या भावनेतून सर्वसामान्य नागरिक एकमुखाने मागणी करत आहेत की, दारव्हा वेशचे तात्काळ पुनरुज्जीवन करण्यात यावे. कारंज्याचा इतिहास पुढील पिढ्यांसाठी जिवंत ठेवण्यासाठी, आता कृतीची वेळ आली आहे.