उत्कृष्ट सेवेसाठी तहसील लिपिक दीपक लहाने सन्मानित

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
मालेगाव,
Deepak Lahane येथील तहसील कार्यालयाचे सेतू सुविधाचे लिपिक दीपक लहाने वेळेत विविध प्रमाणपत्र यशस्वीपणे वितरित केल्याबद्दल निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे यांच्यासह दीपक लहाने यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 

Deepak Lahane award Malegaon tehsil clerk 
नागरिकांना विविध कामासाठी वेगवेगळी प्रमाणपत्रे आवश्यक असतात. प्रमाणपत्र मिळवताना बर्‍याच वेळा नागरिकांची पायपीट होत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. मात्र, मालेगाव तहसील कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्रातून पुरविल्या जाणार्‍या सेवा वेळेतच नाही तर वेळेच्या खुप अगोदर नागरिकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सेतू लिपिक दीपक लहाने हे मागील काही वर्षापासून पार पाडत आहेत. सेतू लिपिक दीपक लहाने व निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे यांची कार्यपद्धती तात्काळ स्वरूपाची असल्याने नागरिकांना तात्काळ सेवा मिळत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गोरे व दीपक लहाने यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आपण करीत असलेले कामे जिल्हाधिकारी कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे यांच्या मार्गदर्शनात जलद गतीने होत असल्याचे सेतू लिपीक लहाने यांनी म्हटले.