अमेरिकन पासपोर्टवर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Donald Trump अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त एक विशेष मर्यादित आवृत्तीतील पासपोर्ट जारी करण्याची घोषणा अमेरिकन परराष्ट्र विभागाने केली आहे. या पासपोर्टच्या आतल्या पानावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असणार असून ही बाब सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.
 

Donald Trump  
या विशेष पासपोर्टमध्ये ट्रम्प यांचा फोटो स्वातंत्र्य जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला असून त्यांच्या स्वाक्षरीचा समावेशही सुवर्णरंगात करण्यात येणार आहे. तसेच पासपोर्टमध्ये अमेरिकेचा ध्वज आणि ऐतिहासिक चित्रांचेही डिझाइन वापरण्यात आले आहे. ही मर्यादित आवृत्ती “अमेरिका २५०” या उपक्रमाअंतर्गत जारी केली जाणार असून अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या विशेष सोहळ्याचा भाग म्हणून याची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे आणि स्मरणीय उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या Donald Trump  माहितीनुसार, हे पासपोर्ट मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसहच राहणार असून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र ही आवृत्ती मर्यादित संख्येत उपलब्ध असेल आणि केवळ काही निवडक कार्यालयांमधूनच ती मिळणार आहे. या निर्णयावर अमेरिकेत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे देशभक्तीच्या उत्सवाचा भाग असल्याचे म्हटले असले तरी काही राजकीय वर्तुळातून यावर टीकाही होत आहे.अशा प्रकारे ऐतिहासिक स्मरण दिनासाठी तयार करण्यात आलेला हा विशेष पासपोर्ट सध्या जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.