संरक्षण क्षेत्राचे ‘हॉटस्पॉट’ बनवण्याची तयारी

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
अहिल्यानगर
Ahilyanagar defence देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पाच्या विस्ताराच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी–श्रीरामपूर परिसरात संशोधन प्रयोगशाळा किंवा संबंधित सुविधा उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, या माध्यमातून महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन आणि संशोधनाचे नवे केंद्र विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

DRDO Ahmednagar defence hub, Ahilyanagar defence research project, 
अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या व्हीआरडीई या डीआरडीओच्या महत्त्वाच्या शाखेमुळे या भागाला आधीपासूनच संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या केंद्रात लष्करी वाहनांचे संशोधन, चाचण्या आणि विविध संरक्षण प्रणालींचे विकासकार्य केले जाते. आता याच पार्श्वभूमीवर आणखी मोठ्या प्रमाणात जमिनीची मागणी आणि नव्या प्रकल्पांची चर्चा सुरू आहे.प्रशासन पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे हजार एकर जमिनीच्या प्रस्तावित वापराबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा झाली असून, या भागात क्षेपणास्त्र, संरक्षण उपकरणे किंवा संबंधित संशोधन प्रकल्प उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचा ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून उदयास येऊ शकतो, असेही संकेत मिळत आहेत.या हालचालींमुळे स्थानिक औद्योगिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः एमआयडीसी क्षेत्र,Ahilyanagar defence  वाहतूक सुविधा आणि तांत्रिक मनुष्यबळाची मागणी वाढणार असल्याने रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात. संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांना येथे विस्तारासाठी अनुकूल वातावरण मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, देशभरात Ahilyanagar defence  डीआरडीओकडून स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित विविध अत्याधुनिक संरक्षण प्रणाली विकसित केल्या जात असून, अलीकडेच अहिल्यानगरमध्येच प्रगत आर्मर्ड प्लॅटफॉर्मचे अनावरणही करण्यात आले होते. त्यामुळे हा परिसर संरक्षण संशोधनाच्या दृष्टीने आधीपासूनच महत्त्वाचा ठरत आहे.या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्प पुढे सरकला तर महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर अहिल्यानगरचे स्थान अधिक भक्कम होणार असून, संरक्षण उत्पादन क्षेत्रात राज्याची भूमिका अधिक प्रभावी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.