पेयजल संकट व इतर समस्यांवर आर्णी तहसील कार्यालयात विचारमंथन

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
arni-tehsil-office-brainstorming : तालुक्यात वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या अध्यक्षतेत व तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी टंचाईसह घरकुलच्या गरजू लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
y29Apr-Manthan
 
 
 
 
उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच पारा वाढल्याने भूजल स्तर खालावला. त्या कारणाने पाणीटंचाईमुळे नागरिकांना विहिरी, बोअरवेल व पाणी साठवणुकीसाठी विविध कामे करावी लागत असल्याने वाळूची गरज वाढते. ही गरज लक्षात घेऊन प्रशासनाने मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
वाळू वाटप प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व महसूल अधिकाèयांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या समितीमार्फत काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे. शासकीय जमिनीवर राहणाèया नागरिकांच्या निवासाच्या दृष्टीने घरांसाठी केलेली अतिक्रमणे नियमानुसार नियमित (रेग्युलर) करण्याचा मुद्दाही बैठकीत विचाराधीन होता.
 
 
यामुळे पात्र नागरिकांना कायदेशीर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीस गटविकास अधिकारी रमेश खरोडे, नायब तहसीलदार उदय तुंडलवार, प्रमोद गुल्हाने, मंडळ व ग्रामपातळीवरील अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पाणी टंचाईकाळात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाळू वाटपात पारदर्शकता आणि अतिक्रमण विरोधात प्रभावी कारवाई होणार आहे.