नागपूर,
Farmers difficulties नरखेड तालुक्यातील विविध गावांना भेट देत सरपंच आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. या दौऱ्यात पांधण रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती, ‘लाडकी बहिण’ योजनेतील अडचणी, गावातील स्वच्छतेचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई, वयोवृद्ध योजनांतील अडथळे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या यांचा आढावा घेण्यात आला.
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी समजून घेत त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून प्रलंबित कामांना गती देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.ही कामे मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके तसेच आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडून मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.Farmers difficulties या भेटीदरम्यान बेलोना सर्कलचे महामंत्री बबलूजी ठाकरे, खरसोली सर्कल प्रमुख शंकरराव बारस्कर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बांदरे, शक्तिकेंद्र प्रमुख दीपकजी नाखले, बूथप्रमुख किशोरजी भोयर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सौजन्य:महादेव तायवाडे,संपर्क मित्र