तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
kharif-season-review-meeting : मंगळवारी येथे झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी आम्हाला येत्या खरीप हंगामात एचटीबीटी बियाणे उपलब्ध करून द्या, अशी मागणी जोरदारपणे केली. यामुळे शेतीवरील खर्च कमी होऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकèयांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील असाअ विश्वासही व्यक्त करण्यात आला.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकèयांचे नियोजन चोख राहावे आणि त्यांना बयाणे, खते यांसारख्या कृषी निविष्ठांचा वेळेवर पुरवठा व्हावा, या उद्देशाने यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्रात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगूळकर होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत या केंद्रात आयोजित बैठकीत खरीप 2026-27 च्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी उपस्थित अधिकाèयांना मार्गदर्शन करताना आ. बाळासाहेब मांगूळकर यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. शेतकèयांना बोगस बियाण्यांपासून वाचवण्यासाठी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर सतर्क राहावे आणि बाजारपेठेत खतांची कोणतीही कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी बजावले.
तसेच, हवामानातील बदलांचा फटका पिकांना बसू नये यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकèयांना वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन करावे, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होऊन शेतकèयांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, तालुका कृषी अधिकारी पूजा गवई, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कचरे, चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत तालुक्यातील पीक विमा योजना, सिंचन व्यवस्था आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी शास्त्रज्ञांनी नवीन वाण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशासकीय यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी मनोज पाचघरे, अशोक भुतडा, अमोल मेहर, प्रभाकर ठाकरे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी आणि कृषी सहायक उपस्थित होते. या बैठकीमुळे आगामी खरीप हंगामासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले.