पुण्यात तीन परदेशी नागरिकांने देश सोडण्याचे आदेश

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |

the country
 
 
पुणे ,
foreign nationals ordered to leave the country पुण्यात पर्यटक म्हणून आलेल्या तीन परदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदाशिव पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. हे तिघेही अमेरिकेचे नागरिक असून, पर्यटनाच्या कारणावरून भारतात आले होते. मात्र, त्यांनी धार्मिक प्रचार केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली. माहितीनुसार, पर्यटक म्हणून प्रवेश घेतल्यानंतरही हे नागरिक परवानगी नसताना धार्मिक संदेश देत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी केली आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना येत्या दहाव्या मेपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे शहरात चर्चा रंगली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.