२२० केव्ही विद्युत उपकेंद्रावर सलग दोन दिवस आगीच्या घटना

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट,
hinganghat fire incidents शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील सगुना फॅटरीजवळ असलेल्या २२० केव्ही विद्युत उपकेंद्र (वणी) येथे सलग दोन दिवस भीषण आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २८ आणि २९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीच्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
hinganghat fire incidents
 
 
जिल्ह्यासह तालुक्यात ४५ डिग्री सेल्सिअस तापमान असताना अशा घटना घडल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटनांमध्ये हिंगणघाट पालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपकेंद्रावर वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
सुरक्षा मानकांनुसार (सेफ्टी नॉर्म्स) आवश्यक ती यंत्रणा आणि नियोजन असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात तशी सुविधा अपुरी असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात अधिक गंभीर दुर्घटना घडण्याची शक्याता नाकारता येत नाही.hinganghat fire incidents आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन अधिकारी गौरव गाणार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील डोळस, वैभव येलगंदेवार, ईश्वर मुंजेवार, ओम लढी, अमित सहारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.