नागपूर,
constables-suicide : पाेलिस हवालदाराच्या पत्नीचे एका शिक्षकाशी प्रेमसंबंध जुळले. दाेघांच्या भेटी-गाठी वाढल्या. ड्युटीवर निघून गेलेला पती अचानक घरी आला. त्यावेळी ते दाेघेही घरात मिळून आले. दाेघांच्या प्रेमसंबंधाचे बींग फुटले आणि पाेलिस हवालदार असलेला पती नैराश्यात गेला. त्याने पत्नीची समजूत घालून सुधरण्याची संधी दिली. मात्र,पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून हवालदार पतीने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबाझरी पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन पाेलिस पत्नीला अटक केली तर तिच्या प्रियकराविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल केला.

शिलरत्नाकर हा पाेलिस दलात कार्यरत हाेता. त्याची प्रतापनगर पाेलिस ठाण्यात बदली झाली. ताे आणि पत्नी रुचिका साेबत इसासनी परीसरात राहायला लागला. दाेन्ही मुलांसह त्यांचा संसार सुरळीत सुरु हाेता. मात्र, गेल्या दाेन वर्षांपूर्वी तिची शिक्षक असलेल्या महेश या युवकाशी ओळख झाली. दाेघांची ओळख वाढून मैत्री झाली. दाेघांच्या भेटी वाढल्यामुळे दाेघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. रुचिका ही दाेन मुलांची आई असल्याची ती विसरुन ती प्रेमात पडली. पाेलिस पती ड्युटीवर जाताच महेश घरी यायला लागला. शिक्षक असलेल्या महेशने प्रेमासाठी शाळेकडे दुर्लक्ष केले. दाेघेही नेहमी साेबत वेळ घालवत हाेते.
अनैतिक संबंधाची कुणकुण
शिलरत्नाकर हे कर्तव्यावर निघून गेले आणि काही वेळातच घरी आले. त्यावेळी रुचिका आणि महेश हे दाेघेही घरात दिसून आले. त्यावेळी रुचिकाने मित्र असल्याचे सांगून वेळ मारुन नेली. त्यानंतर महेश घरी वारंवार दिसायला लागला. पतीला संशय आल्यामुळे त्याने खातरजमा केली. दाेघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तिची समजूत घातली आणि सुखी संसाराला गालबाेट न लावण्याची समज दिली.
पत्नीची अरेरावी आणि पती हतबल
रुचिकाने महेशसाेबत प्रेमसंबंध असल्याचे पतीला सांगितले. प्रेमसंबंध ताेडणार नसल्याचे बजावले. आडकाठी आणल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. घटस्फोट आणि संपत्तीत वाटा देण्यासाठी ती पतीचा छळ करायला लागली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबाझरी पाेलिसांनी रुचिका आणि तिचा प्रियकर महेश विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. रुचिकाला पाेलिसांनी अटक केली असून सध्या ती पाेलिस काेठडीत आहे.