गडचिरोली,
investigate bridge work चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी येथील वैनगंगा नदीवर सुमारे 210 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाला वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच मोठे भगदाड पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुलाच्या कामातील निकृष्ट दर्जामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना देखील जिल्ह्यातील पुलाची व रस्त्याची अशी दयना अवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झालेल्या पुलावर मोठा आणि खोल खड्डा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.investigate bridge work विशेष म्हणजे, पुलाचे अधिकृत उद्घाटन आणि लोकार्पण होण्यापूर्वीच अशी अवस्था झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित अभियंत्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच पुलाच्या गुणवत्तेचे तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.