सतिश वखरे
हिंगणघाट,
formation of maharashtra महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिन येत्या १ में ला साजरा होत असताना हिंगणघाट येथील दोन महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यालयांच्या निमंत्रण पत्रिकांनी मात्र नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. तहसील कार्यालयाने यंदा ६७ तर नगरपालिका प्रशासनाने ६६ वा स्थापना दिवस असल्याचे पत्रिकेत नमूद केले आहे. एकाच शहरात दोन सरकारी कार्यालयांनी दोन वेगळे आकडे दिल्याने प्रशासकीय अधिकार्यांच्या सामान्य ज्ञानावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. या हिशोबाने १ मे २०२६ रोजी राज्याला स्थापन होऊन ६५ वर्षे पूर्ण होत असून हा ६६ वा स्थापना दिवस आहे. असे असताना तहसील कार्यालयाने चक दोन वर्षे पुढे जात ६७ वा आकडा कसा लिहिला, हे एक कोडेच आहे. नगरपालिकेने ६६ वा आकडा लिहिला असला. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग वा तत्सम स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन वातानुकूलीत बसणार्या अधिकार्यांही बाब लक्षात येऊ नये याविषयी आता आश्चर्य व्यत केले जात आहे.
तहसीलदार आणि मुख्याधिकारी हे राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडले जाणारे उच्चशिक्षित अधिकारी असतात.formation of maharashtra निमंत्रण पत्रिका छापण्यापूर्वी तिचा मसुदा अनेक टेबलांवरून जातो. तरीही इतकी मोठी चूक कोणाच्याही लक्षात येऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नेहमी सामान्य जनतेने नियम पाळायचे, मग प्रशासकीय गलथानपणाला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
एका ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व अधोरेखित करणार्या शासकीय निमंत्रण पत्रिकेत अशा चुका होणे हे दुर्दैवी असून, या गोंधळामुळे हिंगणघाटच्या प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.