मुंबई
Maharashtra education department राज्यातील शाळांमध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तसेच प्रगतीपत्रक (रिपोर्ट कार्ड) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे.
शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार, विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीनंतर त्यांची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या चुका समजून घेता येतील आणि पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. याशिवाय, प्रगतीपत्रक देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा अटी घालणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
काही ठिकाणी शुल्क न Maharashtra education department भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे रिपोर्ट कार्ड किंवा शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवण्याच्या तक्रारी पूर्वी समोर आल्या होत्या. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक अधिकारांवर कोणतीही गदा येऊ नये, यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे शाळांच्या मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच पालकांनाही आपल्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येणार आहे.शिक्षण विभागाने सर्व शाळांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.