म्हाडा सदनिका प्रकरणात मनपाने काढलेला जप्ती वाॅरंट रद्द

- स्थायी लाेक अदालत मंचाचा निर्णय

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
mhada-flat-case : म्हाडाच्या सदनिकेचा कर थकित असल्याचे दाखवून मनपाच्या धंताेली सहआयुक्तांनी सदनिका जप्त करण्याचे आदेश काढले. मात्र, स्थायी लाेक अदालत मंचाने मनपाने काढलेले जप्तीचे वाॅरंट रद्द केले.
 
 
MHADA
 
विद्यासागर ओझा (रा. म्हाडा सिटी, गीता मंदिर सुभाष राेड, काॅटन मार्केट) यांनी 21 फेबु्रुवारी 2024 राेजी म्हाडाकडून एक फफ्लॅट रजिस्टर विक्रीपत्राने विकत घेतला हाेता. विद्यासागर यांनी धंताेली विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना बराच वेळा विनंती केली की. त्यांनी विकत घेतलेल्या फफ्लॅटच्या कराराची आकारणी 16 फेबु्रवारी 2024 राेजी किंवा ताबा घेतल्यापासून करावी, ते कर भरण्यास तयार आहे. विद्यासागर यांनी बरेच वेळा पत्रव्यवहार, ई-मेल सुद्धा केलेत.
 
 
परंतु काहीही फायदा झाला नाही. उलट सहआयुक्तांनी 13 फेबु्रवारी 2025 राेजीचा जप्तीचा वाॅरंट रुपये 23 हजार 821 करिता काढला व कर 2019 ते 2025 पर्यंत थकीत असल्याचा दाखविला. विद्यासागर यांनी पुन्हा मनपाला विनंती केली की, त्यांनी फफ्लॅट 2024 मध्ये विकत घेतला. परंतु 2019 पासून मालमत्ता कर थकीत दाखवून जप्ती वाॅरंट काढला ते याेग्य नाही. परंतु याचाही काही ायदा झाला नाही. त्यामुळे विद्यासागर ओझा यांनी 10 डिसेंबर 2025 राेजी स्थायी लाेक अदालत न्यायालय मंचात याचिका दाखल केली.
 
मालमत्ता कर विक्रीपत्र झाल्यापासून घ्या
 
 
सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ आयुक्त यांना नाेटीस पाठवण्यात आली हाेती. परंतु त्यांच्यावतीने काेणीही हजर झाले नाही. प्रकरण आपसात मिटविण्याकरिता ठेवण्यात आले हाेते. परंतु महानगरपालिकेर्ते कुणीही हजर झाले नाही. त्यामुळे सर्व दस्तऐवज तसेच कायदेशीर बाजू लक्षात घेता स्थायी लाेक अदालत न्यायालय मंचाचे अध्यक्ष दीपक भेंडे, सदस्या प्रतिभा अनकर व अर्चना बागडे यांनी निर्णय दिला की, मनपाने पाठवलेला जप्तीचा वाॅरंट गैरकायदेशीर असल्यामुळे ताे रद्द करण्यात येत आहे. तसेच मनपाला निर्देश दिले की , त्यांनी एका महिन्यात विद्यासागर ओझा यांचे नावे असलेला फफ्लॅटचा मालमत्ता कर विक्रीपत्र झाल्यापासून ठरवून घ्यावा तसेच जर या फफ्लॅटबाबत, विक्रीपत्र करण्याअगाेदर काही घेणी असल्यास ती रक्कम म्हाडा अथाॅरिटीकडून वसूल करावी. तसेच मानसिक त्रास व खर्च 5 हजार रूपये अदा करावे. याप्रकरणाचा निकाल चार महिन्यांत लागला.