मुंबई
Mumbai Municipal Corporation recruitment मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अंतर्गत असलेल्या एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्च (MCMCR) या संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत प्रमुख, असोसिएट फॅकल्टी, अभियंता तसेच कार्यालयीन सहायक अशा महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीमध्ये सिव्हिल आणि इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांमध्ये असोसिएट फॅकल्टी पदांसह उप परिरक्षण अभियंता किंवा सहायक परिरक्षण अभियंता आणि कार्यालयीन सहायक पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून, नियुक्तीचा कालावधी तीन वर्षांचा असेल. उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे पुढील मुदतवाढ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
अंतिम तारीख काय आहे?
प्रमुख पदासाठी अर्ज करण्याची Mumbai Municipal Corporation recruitment अंतिम तारीख ५ मे २०२६ तर इतर पदांसाठी ११ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी आणि कागदपत्रांसह दिलेल्या ईमेलवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.एमसीएमसीआर ही महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असून, येथे विविध शहरी विकास आणि तांत्रिक प्रशिक्षण उपक्रम राबवले जातात. त्यामुळे या भरतीमुळे अभियंते आणि प्रशासकीय क्षेत्रातील तरुणांसाठी मुंबई महापालिकेत काम करण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अचूक आणि पूर्ण स्वरूपात सादर करणे गरजेचे आहे. वेळेत अर्ज सादर न केल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.