नरेंद्रनगर रेल्वे पुलाखाली घाणीचे साम्राज्य!

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Municipal Corporationनरेंद्रनगर परिसरात नुकताच रॅडिसन ब्लू ते नरेंद्रनगर दरम्यान रेल्वेचा मोठा ओव्हरब्रिज उभारण्यात आला आहे. या पुलाखालून नरेंद्रनगर ते मनीषनगर असा रस्ता जात असून, तो पुढे चिचभवनमार्गे वर्धा रोडला जोडतो. या मार्गावरील बोरकुटे लेआउटमध्ये महानगरपालिकेने कचऱ्याची पेटी ठेवली आहे.या कचरा पेटीत परिसरातील नागरिक कचरा टाकतात, मात्र महानगरपालिकेकडून कचऱ्याची नियमित उचल होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कचरा वेळेवर न उचलल्याने तो रस्त्यावर पसरतो आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते. अनेकदा कचरा इतका वाढतो की तो मुख्य रस्त्यावर येतो.
 

sum 
 
 
या घाणीमुळे भटकी जनावरे रस्त्यावर जमा होतात, ज्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. Municipal Corporation काहीवेळा दोन-तीन दिवस कचरा न उचलल्यास रहिवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याची वेळ येते.याशिवाय, बुधवारी भरल्या जाणाऱ्या बाजारातील उरलेला भाजीपाला तसेच रसवंती केंद्रांमधील कचरा देखील येथेच टाकला जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. परिणामी, बोरकुटे लेआउटमधील रहिवाश्यांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.या पार्श्वभूमीवर, संबंधित कचरा पेटी तात्काळ हटवावी किंवा कचरा व्यवस्थापन नियमित करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सौजन्य:डॉ. राजेंद्र पहाडे ,संपर्क मित्र