७३९ शेतकर्‍यांचे होणार नुकसान

हमीभाव खरेदी पोर्टल तत्काळ सुरू करा

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
सेलू,
NAFED चणा हमीभाव खरेदीचे पोर्टल अचानक बंद करण्यात आल्याने सेलू तालुयातील ७३९ शेतकर्‍यांचा चणा विक्रीचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे खरेदी पोर्टल सुरू करून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सिंदी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे सभापती दिलीप गावंडे यांनी केली आहे.
 

NAFED 
सेलू तालुयात नाफेडची खरेदी ज्या समितीकडून केली जाते त्या खरेदी विक्री समितीकडे ११५९ शेतकर्‍यांनी नोंदणी केली. त्यापैकी नाफेडने ४२० शेतकर्‍यांचा चणा खरेदी केला अन् अचानक पोर्टल बंद करून शेतकर्‍यांना एक धकाच दिला. अद्यापही ७३९ शेतकर्‍यांजवळील चणा खरेदी करणे बाकी आहे. १०४५४.२४ विंटलची खरेदी केली असली तरी ५४८.२९ विंटलची खरेदी रखडली आहे. बाजारात शासनाच्या हमीभावापेक्षा भाव कमी मिळत असल्याने शेतकर्‍यांची भिस्त नाफेडवर अवलंबून होती. अशातच शासनाने हात आखुडला असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे शेतकर्‍यांच्या मदतीला सिंदी शेतकरी खरेदी विक्रीचे अध्यक्ष दिलीप गावंडे व संचालक मंडळाने जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देत २५ ते ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, आवश्यक बारदानाची व्यवस्था करावी, हरभरा खरेदीचे केंद्र तत्काळ सुरू करावे, असे निवेदनात नमूद आहे.
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीने व सिंदी शेतकरी खरेदी विक्री समितीने हरभरा खरेदीचे नाफेडचे बंद करण्यात आलेले केंद्र त्वरित सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी केली असून याला कितपत व कधी यश येते याकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहे