रिसोड,
Pimparkhed Wadi Gram Panchayat तालुयातील पिंपरखेड - वाडी व वडजी या गावातील सरपंच पदाच्या पोटनिवडणूक निकाल २९ एप्रिल रोजी सकाळी घोषित करण्यात आला. या दोन्ही गावासाठी २८ एप्रिल रोजी मतदान झाले होते.
रिसोड तहसील कार्यालयांमध्ये सदर निवडणूक मतमोजणी करण्यात आली.यामध्ये पिंपरखेड - वाडी येथून सुनिता दीपक जायभाये यांनी शारदा दत्ता घुगे यांचा ५२ मतांनी पराभव केला. वडजी ग्रापं पोटनिवडणुकीत गजानन नरसिंगराव देशमुख यांनी केशव श्रीरंगराव बोरकर यांचा ३४४ मतांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर विजय उमेदवारांनी आपापल्या गावात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळून Pimparkhed Wadi Gram Panchayat पेढे वाटून आतिषबाजी व विजयाच्या घोषणांनी गाव अक्षरशः दुमदुमले होते. पिंपरखेड वाडी ग्रापं पोटनवडणुकीत सुनिता जायभाय यांना ३३६ मते मिळाली असून, शारदा घुगे २८४ मते मिळाली. वडजी ग्रापं पोटनिवडणुकीत गजानन देशमुख ६३४ मते तर केशव बोरकर यांना २९० मते मिळाली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला.