नागपूर,
Rajarajeshwari Temple अत्रे लेआऊट परिसरात १ मे ते १० मे दरम्यान बालकांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्ग दररोज सकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत राजराजेश्वरी मंदिर सभागृह येथे पार पडणार आहे.
४ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा वर्ग असून, सहभाग शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये मुलांना संस्कार, शिस्त आणि नैतिक मूल्यांचे धडे दिले जाणार आहेत. Rajarajeshwari Temple प्रताप नगर परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना या संस्कार वर्गात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा उपक्रम अत्रे लेआऊट शाखा व मातृ शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
सौजन्य:संदीप देव,संपर्क मित्र