मुंबई
Sanjay Dutt बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा आगामी चित्रपट केडी : द डेव्हिल हा वादात सापडला आहे. या चित्रपटातील “सरके चुनर तेरी सरके” गाण्यात अभिनेत्री नोरा फतेही झळकली असून गाण्याचे बोल आणि नृत्यदिग्दर्शनाबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यामुळे या गाण्याभोवती निर्माण झालेल्या वादामुळे संजय दत्तला महिला आयोगासमोर हजर व्हावे लागले होते. संजय दत्त आपल्या वकिलासह आयोगाच्या कार्यालयात पोहोचला आणि त्याने या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडली.
संजय दत्तच्या वकिलाने सांगितले की, संजय दत्तने महिलांविषयी आणि आयोगाविषयी आपला आदर व्यक्त केला आहे. संजय दत्तने आयोगासमोर स्पष्ट केले की, त्याला गाण्याच्या मूळ शब्दांची कल्पना नव्हती. तरीही, त्याने कोणत्याही अटींशिवाय बिनशर्त माफी मागितली आहे. शिवाय, एक उदात्त उपक्रम हाती घेत त्याने आदिवासी समाजातील 50 मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली Sanjay Dutt आहे. संजय दत्तने स्पष्ट केले की, जेव्हा हे गाणे ध्वनिमुद्रित करण्यात आले होते, तेव्हा ते वेगळ्या भाषेत होते. त्यामुळे या गाण्याच्या हिंदी भाषांतरातील नेमक्या शब्दांची त्याला माहिती नव्हती. तरीही, नैतिक औचित्याची जाणीव ठेवून त्याने माफी मागणे योग्य मानले.