'सॉरी मम्मी, गंगेने मला बोलावलंय'; हृदयद्रावक स्टेटस टाकत तरुणाची आत्महत्या!

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वाराणसी,
Young man commits suicide मोबाईलवर भावनिक संदेश टाकल्यानंतर बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह गंगेत आढळला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी घरातून अचानक निघून गेलेल्या निखिल कुमार राय या तरुणाचा शोध सुरू असतानाच बुधवारी लंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागवा परिसरात, संत रविदास घाटाजवळ गंगेत त्याचा मृतदेह सापडला.
 
suicide
 
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर एकुलत्या एक मुलावर अवलंबून असलेल्या आईला ही बातमी कळताच त्या बेशुद्ध पडल्या. Young man commits suicide निखिलने सोमवारी आपल्या मोबाईलवर एक भावनिक संदेश टाकल्यानंतर तो घरातून निघून गेला होता आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला होता.
 
नातेवाईकांनी तो संदेश पाहिल्यानंतर तातडीने कुटुंबाला माहिती दिली. संदेश वाचल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आणि तिने तातडीने शोध सुरू केला, मात्र काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर रात्री उशिरा पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. Young man commits suicide मोबाईलवरील संदेशात निखिलने वैद्यकीय उपचार आणि औषधांमुळे कंटाळा आल्याचे लिहिले होते. तसेच आईला उद्देशून निरोप देत त्याने आपले जीवन संपवत असल्याचा उल्लेख केल्याचे सांगितले जाते. हा संदेश वाचल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
 
निखिलचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले असून तो कुटुंबाचा आधार होता. तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कुटुंबीय आणि मित्रांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोणताही गंभीर आजार नसतानाही त्याने असे पाऊल उचलल्याने संशयही व्यक्त केला जात आहे. Young man commits suicide या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. निखिलने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. कुटुंबीयांनीही संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.